स्वच्छ भारत:समृध्द भारत
नवीन शतकात संपन्न सामर्थ्यशाली व समृध्द भारताचे शुभंकर चित्र पाहण्यासाठी भारताचा सर्वागिण सर्वसमावेशक व शाश्वत विकास होणे अत्यावशक आहे.आणखी काही बर्षाच्या काळात भारत आर्थिक महासत्ता होईल.आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक विकासालाही अनन्यसाधारण महत्व आहे.स्वच्छ पिण्याचे पाणी आणि सुधारीत स्वच्छता हे दारिद्र कमी करण्यासाठी महत्वाचे घटक आहेत.
जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी वसते.स्वच्छतेबाबत महात्मा गांधी म्हणाले होते.स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्वपुर्ण भुमिका बजावते.देशात स्वच्छतेची कारणे विचारात घेतली असता जनताजागृतीचा अभाव चूकिच्या पारंपारिक पध्दति पाण्याची कमतरता गरिबी निरक्षरता पर्यावरण पुरक तंत्रज्ञानाचा अभाव ही कारणे पुढे येतात.ह्या कारणाचा शोध घेवून धडपडने परिणाम कारक कृतिक्षील कार्यक्रमाची आखणी करुण त्याची अमलबजावणी करत आहे.