उपक्रम

क्रांतिकारी कवि संमेहलन

भगतसिंगचा जन्म पंजाब राज्यातील तत्कालीन लाहोर जिल्ह्यातील बंगा नावाच्या खेड्यात 28 सप्टें. 1907 रोजी झाला. भगतसिंग आपल्या चुलत्यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढयासाठी प्रेरित झाले. त्यांच्या क्रांतीच्या विचारांना खरी चालना मिळाली ती, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर. तेव्हापासून भगतसिंगने स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला वाहून घेतले. भगतसिंगांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव हे भगतसिंगाचे प्रमुख साथीदार. 23 मार्च 1931 ला या तिघांना इंग्रज सरकारने फासावर चढवले आणि भगतसिंग राजगुरू सुखदेव हे नाव इतिहासात अमर झाले. शेवटपर्यंत इन्कलाब झिंदाबाद च्या घोषणा देत तरूण वयात देशासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग राजगुरू सुखदेव भारतीय स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देऊन गेले. भारतीय युवकांसमोरील खरे खुरे आयडॉल्स ठरले ही भुमिका समोर ठेवून धडपडने क्रांतीकवि संमेलन आणि विचार जागर पत्रकाचे प्रकाशन केले आहे.

5 thoughts on “क्रांतिकारी कवि संमेहलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *