उपक्रम

शोध महामानवाचा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतमातेचे एक महान सुपुत्र. त्यांनी विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडात भारतातील सामाजिक, सांस्कृतीक,  आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात डॉ.बाबासाहेब अग्रेसर होतेच;शिवाय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राज्यघडनेचे शिल्पकार म्हणून इतर अनेक क्षेत्रातील विविधलक्ष्मी कामगिरीतून डॉ.बाबासाहेब आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी आपले सर्वस्व वाहून घेतले.

डॉ.बाबासाहेबानी दिलेला मंत्र शिका-संघटीत व्हा आणि संघर्ष करा याप्रमाणे धडपड सोशल फांउडेशन या महामानवाच्या जंयती निमित्ताने अनेक खेड्यामध्ये जाऊन खरे डॉ.बाबासाहेब तरुणाना समजण्यासाठी प्रबोधनपर व्याख्यान मालेचे आयोजन केले जाते. यातून अनेक तरुणाना आपले मत माडण्याचे अनोखे व्यासपीठ देण्याची धडपड यशस्वी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *