आमच्याबद्दल माहिती
धडपड सोशल फाऊंडेशन – धडपडणार्या तरूणाईसाठी तुम्ही-आम्ही-आपण
आज २१ व्या शतकात जागतिक पातळीवर अनेक समस्या आहेत. प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतो. लहान मुलाजवळ वेळ अाहे पण शक्ती :पैसा नाही; वृद्धाजवळ पैसा;वेळ या अाहे पण शक्ती नाही.पंरतू तरूण हा असा घटक आहे की त्याच्या जवळ या गोष्टी अाहेत. इतिहास घडवण्याची आणि बदलण्याची धडपड फक्त तरूणाईतच असते.
पण हाच तरुण जर अनेक समस्या मध्ये अडकला (ग्रासल) असेल तर त्याच्या हातून कोनतेही विधायक काम होणार नाही.तरुणाच्यात आज मोठ्या प्रमाणात अणेक समस्या आहेत. या समस्या आपल्या समाज मनाला कडकड वाटती.
आम्हच्या समस्या समाज मनाला कटकट वाटते.जर का एखादी समस्या कटकट वाटत असेल तर त्या गोष्टी कडे कोणाचेही लक्ष जात नाही. समाजातून तरुणाकडे फक्त स्वप्नपूर्ति करणारे साधन म्हणून पाहीले जाते. यातून न-पेलणारे आपेक्षाचे आझे आम्ही वाहत असतो.या आपेक्षा पुर्तता नाही झाली तर आम्ही समाज मना मध्ये बाद ठरवल जाते.
माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि आपल्या व्हिजन २०२० या पुस्तकात म्हणतात 2020 साली भारत महासत्ताक होणार कारण भारतात सर्वात जास्त तरूणाची लोकसंख्या आहे.पण जास्त लोकसंख्या असल्याने कोणताच देश प्रगत होऊ शकत नाही.त्यासाठी ती तरूणाई कार्यक्षम-जिद्दी-राष्ट्रप्रेमी असावि लागते. भारतातील तरून एख लाख टक्का जिद्दी आहे.पण त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणिना गरज आहे ती स्वताची दिशा आणि दशा ठरवण्याची.
वर लिहल्या प्रमाणे तरूण इतिहास घडवतो आणि बिघडवतो सुध्दा जागतिक पातळीवर इतिहासात अशा अणेक घटना घडल्या आहेत. जर आपला भारत देश महासत्ताक बनवायचा असेल तर तरुणाच्या समस्यावर उपाय कोण शोधणार ? तरूणाची दिशा आणि दशा कोण ठरवणार ?असे अणेक प्रश्न आम्हा तरूणा पुढे उपस्थित होत होते. शेवटी प्रश्न हे आमचेच होते त्यासाठी उत्तर हे आम्हचेच असले पाहीचे अशी धडपड होती. या धडपडीतून सुरवात झाली धडपडणार्या तरूणाईसाठी धडपड सोशल फाऊंडेशन असे म्हटले जाते की तुम्ही एखाद्याला जेव्हा मदतीचा हात देता तेव्हा ती मदत लहान आहे की मोठी हे महत्वाचे नसते तर इतरांना मदत करण्याचे संस्कार व ती दानत तुमच्यात आहे हे महत्वाचे असते. आता विचार करावाच लागेल !
भारत महासत्ता ‘स्वप्न ‘ की ‘सत्य’..?
मित्रांनो,
‘भारत माझा देश आहे’ हि प्रतिज्ञा म्हणत म्हणत आपण मोठे झालो. मोठे झाल्यावर निरीक्षण करायला लागलो, निरीक्षण करता करता वास्तव भारताचा अभ्यास करु लागलो..आणि मनात विचार येवु लागला की भारताच भवितव्य काय..??
ज्या भारतात माणुस जन्माला आल्यानंतर एक गोष्ट न मागता मिळते ती म्हणजे “जात”..,ज्या देशात 6500 ‘जाती ‘आणि 7000 पेक्षा जास्त पोटजाती आहेत त्या भारताच भवितव्य काय ??
ज्या भारतात कार्यानुभव विषयात ‘टिव्ही दुरुस्ती ‘, मोबाईल दुरुस्ती न शिकवता ,कागदापासुन ससा कसा करावा ? कागदापासुन घोडा कसा बनवावा हे शिकवतात त्या भारताच भवितव्य काय ??
ज्या भारतात फक्त 7% विध्यार्थीच उच्च शिक्षण घेतात त्या भारताच भवितव्य काय ??
मुळात देशाच नाव भारत , INDIA, की हिंदुस्थान यावरुन वाद .. त्या भारताच भवितव्य काय ??
ज्या भारतात 3.45 % पेक्षा कमी खर्च शिक्षणावर केला जातो त्या भारताच भवितव्य काय ??
ज्या भारतात 77% लोक दररोज एकवेळ वडापाव खाऊन झोपतात त्या भारताच भवितव्य काय ?
ज्या देशात दररोज खुन,मारामारी,बलात्कार होतात त्या भारताच भवितव्य काय ?
ज्या देशातला तरुण “आम्ही दोघ, आमची दोन,आमचा एक चौकोण ना आत कोन ना बाहेर कोण “यात गुरफाटुन राहीलाय त्या भारताच भवितव्य काय ?
ज्या भारतात दर दिड सेकंदाला एक मुल जन्माला येत त्या भारताच भवितव्य काय?
ज्या भारतात धर्माच्या नावावर राजकारण केल जात त्या भारताच भवितव्य काय ?
ज्या भारतात 4% भांडवलदार 96% गरीबांचे शोषन करतात त्या भारताच भवितव्य काय ?
ज्या देशात 84 हजार मंदिरे असुन,वर्षाला 11 हजार कोटी रुपये मंदिरांना मिळतात त्या अंधश्रद्धाळु भारताच भवितव्य काय ??
मित्रांनो,
कोई भी देश perfect नही होता उसे perfect बनाना पडता है.
या नव्या धडपडीणे धडपड सोशल फाऊंडेशन ही सामाजिक बांधिलकी जपत तरुणासाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे. तरुणामध्ये सामाजिक बाधिलकी वाडवने तरुणाच्या समस्यावर उपायोजनात्मक काम करणे. तरुणाना कला गुणाना व्यासपिठ उपलब्ध करून देणे. Types of erectile dysfunction encompass psychological and physiological causes, including stress-induced or vascular issues. Treatment options range from medication to lifestyle changes. For comprehensive resources, visit our website for further guidance. महत्वाचे म्हणजे तरूणाचा स्व प्रगल्भ करणे .
या धेय्याने धडपडणार्या युवकाणी धडपडणार्या युवकासाठी चालवलेले व्यासपिठ म्हणजेच धडपड सोशल फाऊंडेशन धडपड सोशल फाऊंडेशनच्या उपक्रमाबदल
१)युवा संघटन
२)मदतगार समिती
३)धडपड क्रियेशन आणि फिल्म क्लब
४)धडपड पब्लिकेशन
५)धडपड बुक फोरम
६)धडपड युवाजागर मचं
७)स्री शक्ति व्यासपिठ
८)पर्यावरन संवर्धन कृती कार्यक्रम संमिती
९)विचार जागर मंच
अशा अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून आजचा युवक घडवण्याची आम्हची धडपड सुरु आहे.
ध्येय: सर्वोच्य ध्येयासाठी काम करणारी आजच्या तांत्रिक व स्पर्धात्मक युगाला सामोरे जाण्यासाठी व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी रचनात्मक काम करणारी स्वयंसेवी सामाजिक संस्था अशी आेळख धडपड सोशल फाउंडेशन ची ओळख करुन देता येईल
कविता.
नाव:- धडपड
कर धडपड तू
लढण्याची बात हाय
निळ्याभोर नभाला रे
धरणीची साथ हाय ।।धृ।।
लोकाच्या जिवाशी
केलाय इथं खेळ
वाहनाची गर्दि
नाही खड्यांचा मेळ
मातीशी नात
अगात येऊदे बळ
रक्तातच आमच्या
समाज कार्याला वेळ
युवा जागृतीची मनी
पेटली वात हाय
निळ्याभोर नभाला रे
धरणीची साथ हाय
कर धडरड….।।१।।
हातात हात
बांधू एकीचा किल्ला
विसरुन भेद
उरी देशाचा बिल्ला
करु स्वच्छ
सारे गल्ली मोहल्ला
जनतेला देऊ
न्याय समतेचा सल्ला
अंधार्या जगावर आता
उजेडाची मात हाय
निळ्याभोर नभाला रे
धरणीची साथ हाय
कर धडपड तू…।।२।।
होऊदे भिरकीट
डोक्यात पेटलया रान
शोधतो वाट
आल वादळी तुफान
जातोया पुंढ
भारत देशाची शान
लागल याड
बनू इतिहासाच पान
डोळ्याम्होर शिवबा आम्ही
मावळ्याची जात हाय
निळ्याभोर नभाला रे
धरणीची साथ हाय
कर धडपड ….।।३।।